मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठरवतील तो पालकमंत्री

कॅबिनेटमंत्री अतुल सावे : दोन दिवसांत होणार खाते वाटप
Cabinet Expansion
Cabinet Expansion

औरंगाबाद : बहुचर्चित शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर आता खाते वाटप आणि पालकमंत्री कोण होणार? याविषयी चर्चा सुरू झाली आहे. ज्याप्रमाणे मंत्रिमंडळाच्या विस्ताराला वेळ लागला. तेवढा वेळ खाते वाटपाला लागणार नाही, तर येत्या दोन दिवसांत खातेवाटप केले जाईल, अशी माहिती कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी चिकलठाणा विमानतळावर माध्यमांशी बोलताना दिली.

कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अतुल सावे पहिल्यांदाच औरंगाबादेत आले असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर शपथ घेतलेल्या मंत्र्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजवंदनाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यात औरंगाबादची जबाबदारी कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांना देण्यात आली आहे. यामुळे औरंगाबादचे पालकमंत्रिपद शिंदे गटाकडे जाणार असल्याचे बोलले जात आहे. याविषयी विचारले असता श्री. सावे म्हणाले, की असे काही नाही.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठरवतील तो पालकमंत्री, ते जे आदेश देतील तो आम्ही पाळणार आहोत. दरम्यान, सोबत आलेले संजय शिरसाट हे नाराज असल्याचे बोलले जाते. मात्र संजय शिरसाट हे नाराज नसून त्यांनाही संधी मिळणार असल्याचे अतुल सावे यांनी आवर्जून सांगितले.

विकासासाठी प्रयत्नशील

कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री सावे यांचे शहरात सर्वत्र जंगी स्वागत करण्यात आले. अतुल सावे म्हणाले, की माझ्यावर टाकलेली जबाबदारी विश्वासाने पूर्ण करेल, मराठवाडा तसेच राज्याचा विकास करेल. औरंगाबाद शहरात अडीच वर्षांत रखडलेले विकासाचे प्रकल्प लक्ष घालून पूर्ण करणार आहे. औरंगाबाद महापालिकेवर भाजप शिवसेना मिळून युतीचा पुन्हा झेंडा फडकवण्यात येईल. मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर मी पहिल्यांदा जाऊन पाणीपुरवठा विभागाचे सचिव संजीव जैस्वाल यांची भेट घेतली व पुढील आठवड्यात बैठक घेणार असून यामध्ये विभागीय आयुक्तांसह इतर अधिकारी राहतील. यासह पाण्याच्या प्रश्न सोडवण्याबरोबर शहरात नवीन उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नव्याने येणाऱ्या कॉस्मोसह अन्य एका कंपनीला आवश्यक असलेली ती मदत सर्व करणार आहे. तसेच बंद पडलेली मराठवाडा वॉटर ग्रीड योजनाही सुरू करणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com