Aurangabad : वीजबिल भरता येत नाही, मग शेती कशाला करता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farmers

वीजबिल भरता येत नाही, मग शेती कशाला करता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिल्लोड : सिल्लोड तालुक्यात महावितरणच्यावतीने बीजबिल वसुलीसाठी शेतशिवारातील रोहित्र बंद करण्याचा सपाटा सुरू करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी वीज पुरवठा सुरु करण्याच्या मागणीसाठी गेले असता महावितरणच्या एका सहायक अभियंत्याने वीजबिल भरता येत नाही, मगच शेती कशाला करता अशा भाषेचा उपयोग करून बळिराजाचा अपमान केले. या प्रकारामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये सदर अधिकाऱ्यांबद्दल संताप व्यक्त केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महावितरणने शेतकऱ्यांना माहिती देऊन वसुली करणे आवश्यक असताना गोळेगाव येथील महावितरण कार्यालयाने मात्र, पूर्वसूचना न देता पानवडोद खुर्द, पानवडोद बुद्रूक शिवारातील रोहित्राचा वीजपुरवठा खंडित केला. या प्रकारानंतर शेतकऱ्यांनी गोळेगाव महावितरण कार्यालयाचे सहायक अभियंता बी. एन. कडेल यांची भेट घेऊन वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना वीज बिल भरता येत नाही तर शेती कशाला करता अशी अशी भाषा वापरली. याप्रकाराबाबत शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.

दरम्यान, महावितरणच्या वतीने शेतशिवारातील वीज वसुलीसाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. अद्याप अनेक शेतकऱ्यांना अतिवृष्टीची भरपाई मिळालेली नाही, तोच शेतकऱ्यांकडून बिल वसुली करण्याचा सपाटा महावितरणकडून सुरू झाला आहे. बहुतांश ठिकाणी रब्बीची पेरणी करून पिकांना पाणी देणे सुरू झाले असल्यामुळे वीज बंद झाल्याने शेतकरी कात्रीत सापडले आहे. पाणी न दिल्यास बियाणे वाया जाण्याची भीती आहे. याबाबत याप्रकरणी सिल्लोड येथील विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता सुरेश जाधव यांच्याशी संपर्क साधला असता याप्रकरणी माहिती घेतो. शेतकऱ्यांनी वसुलीसाठी सहकार्य करावे, वीजपुरवठा खंडित करण्याची वेळ येऊ देऊ नका. तसेच शेतकऱ्यांना वीजबिले भरण्यासाठी माहिती देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. तसेच गोळेगाव कार्यालयाच्या अंतर्गत दोन्ही गावातील रोहित्र बंद केले असल्याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

बिले भरण्यासाठी माहिती न देता रोहित्राचा वीज पुरवठा बंद केला आहे. याप्रकरणी गोळेगाव येथील कार्यालयात गेलो असता अधिकाऱ्यांनी उद्धट भाषा वापरून बिले भरा, बिल भरता येत नाही तर शेती कशाला करता असा अजब सल्ला दिला.

विलास दौड, शेतकरी, पानवडोद बुद्रूक.

वसुलीसाठी गावांमध्ये शेतकऱ्यांना वीजबिले भरण्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्येक गावात दवंड्या दिल्या. वसुलीसाठी रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.

बी.एन.कडेल

सहायक अभियंता, महावितरण कार्यालय, गोळेगाव.

बिले भरण्यासाठी महावितरणने शेतकऱ्यांना माहिती द्यावी, अशी आमची मागणी होती. पूर्वसूचना न देता पुरवठा खंडित केला आहे.

विक्रांत दौड,

माजी पंचायत समिती सदस्य.

loading image
go to top