Sambhaji Nagar : अवघ्या शहरात राबवा ‘ऑपरेशन क्लीनअप’

हे ऑपरेशन मोठ्या प्रमाणात राबविले गेले.
Sambhaji nagar
Sambhaji nagarsakal

Sambhaji Nagar : शहरातील नशेच्या बाजाराचा ‘सकाळ’ने पदार्फाश केला. सातत्याने हा विषय लावून धरल्यानंतर पोलीस प्रशासनाने देखील ‘ऑपरेशन क्लीनअप’ हाती घेतले आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ १ अंतर्गत हे ऑपरेशन मोठ्या प्रमाणात राबविले गेले. उपायुक्त नितीन बगाटे स्वतः रस्त्यावर उतरले.

रस्त्यावर नशेखोरी करणाऱ्या तळीरामांना चांगलाच इंगा दाखवण्यात आला. परिमंडळ-१ प्रमाणेच परिमंडळ-२ अंतर्गत देखील कारवाईची मोहीम राबवण्यात येत आहे. नारेगावसारख्या भागात यासाठी कोंबींग ऑपरेशन राबवण्यात आले. शहरातील अवैध दारू विक्रेत्यांविरूध्द रोज कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली.

वाळूज भागातील वाईन शॉपच्या आजूबाजूला तर अक्षरक्षः मद्यपींनी धुमाकूळ घातला होता. रस्त्यावरून फिरणे सामान्य नागरिकांना अवघड झाले होते. ‘स्ट्रीट क्राईम’ रोखण्यासाठी पोलिसांनी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे. कुख्यात गुन्हेगार अजय ठाकूर हा चोरी-घरफोडीसारखे गुन्हे बंद करून बटन, गांजा, चरस, एमडीच्या धंद्यात उतरला. इंस्टाग्रामवर त्याने नशेचा चक्क बाजार मांडला होता.

Sambhaji nagar
Ch. Sambhaji Nagar : ठाकरे स्मारकाचे अडीच वर्षांत अर्धेच काम

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विक्री विरोधी पथकाने फिल्डिंग लावत अजयच्या मुसक्या आवळत त्याची हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे. मात्र, असे एकट्या अजय ठाकूर विरुद्ध कारवाई करून किंवा काही दिवस ‘ऑपरेशन क्लीनअप’ राबवून चालणार नाही. पोलिसांना ही कारवाई सातत्याने आणि ठामपणे राबवावी लागणार आहे.

शहराला नशेच्या बाजाराने मोठ्या प्रमाणात विळखा घातला आहे. याची पाळेमुळे पोलिसांना उखडून फेकावी लागणार आहेत. शहरातील बटन, गांजा, चरस, एमडीसारखे पदार्थ सर्रास कसे विकत मिळतात, हा मोठा प्रश्न आहे. पोलिस आणि जिल्हाधिकारी प्रशासनाने खरेच याबाबत आणखी कडक पावले उचलवीत अशी सर्व सामान्य नागरिकांची मोठी अपेक्षा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com