esakal | संचारबंदीत भूमीपुजनाचा अट्टहास! आमदार संजय शिरसाटसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay shirsat

संचारबंदीत भूमीपुजनाचा अट्टहास! आमदार संजय शिरसाटसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

sakal_logo
By
रामराव भराड

वाळूज (औरंगाबाद): कोरोना काळात जमावबंदी व संचारबंदी असतानाही बजाजनगरात जलवाहिनीच्या कामाचे भुमिपुजन करुन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार संजय शिरसाट यांच्यासह शिवसेनेच्या 35 ते 40 पदाधिकार्यांवर रविवारी (ता.25) रोजी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाचा संसर्ग पसरवू नये म्हणून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही बंदी झुगारून रविवारी (ता.25) रोजी बजाजनगरातील जयभवानी सोसायटीत नवीन जलवाहिनीच्या कामाचे भुमीपुजन आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला सरपंच सचिन गरड, तालुका प्रमुख हनुमान भोंडवे, उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, बबन सुपेकर, कृष्णा राठोड, कैलास चव्हाण, सुनील काळे, जितेंद्र जैन, पोपट हंडे, शिल्पा नरवडे, अर्चना जाधव, सुनिता गाडे, सविता काकडे आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा: आरोग्यमंत्री टोपेंना जेवायलाही वेळ मिळेना; विमानतळावर गाडीतच बसूनच घेतला

कोरोना काळात सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमवुन नियमांचे उल्लंघन केले. म्हणून डावात माचाळा पार्टीचे भारत फुलारे यांनी पोलिस आयुक्ताकडे निवेदन दिले होते. या प्रकरणी पोकॉ.विनोद नितनवरे यांच्या फिर्यादीवरुन रविवारी रात्री आमदार संजय शिरसाट यांच्यासह 35 ते 40 जणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन पागोटे हे करीत आहेत

loading image