esakal | आरोग्यमंत्री टोपेंना जेवायलाही वेळ मिळेना; विमानतळावर गाडीतच बसूनच घेतला
sakal

बोलून बातमी शोधा

rajesh tope

आरोग्यमंत्री टोपेंना जेवायलाही वेळ मिळेना; विमानतळावर गाडीतच बसूनच घेतला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: सध्या राज्यात कोरोनाने बिकट परिस्थिती केली आहे. प्रशासन सध्या सगळीकडे युध्दपातळीवर उपाययोजना करत आहे. अशातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये आरोग्यमंत्र्यांना जेवणासाठीही वेळ नसल्याचे दिसत आहे. वेळ कमी असल्याने टोपे यांनी औरंगाबाद विमानतळावर गाडीतच जेवण केल्याचा तो व्हिडीओ आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आरोग्यमंत्री राजेश टोपे रुग्णांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. रुग्णांची हेळसांड होऊ नये, यंत्रणेत काही कमी पडू नये याासाठी ते नेहमी ऑन फिल्ड दिसत आहेत. मंत्री टोपे मुंबईला जाण्यासाठी औरंगाबाद विमानतळावर आले होते. त्यावेळेस त्यांनी गाडीतच जेवण केले. या बद्दलचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठा व्हायरल होत आहे. मंत्री टोपे यांच्या कामाबद्दल कौतुक केलं जात आहे.

हेही वाचा: दिलासादायक! मराठवाड्यात रिकव्हरी रेट वाढला, रुग्णवाढ घटली

मंत्री टोपे यांच्या आई शारदा टोपे यांचं मागील वर्षी दु:खद निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर राजेश टोपे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळूनही टोपे काही काळातच कोरोना विरोधाच्या लढाईत पुन्हा सक्रिय झाले होते.

loading image