Breaking| भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, आमदार सावे यांच्यावर गुन्हे दाखल

आंदोलनापुर्वी माजी केंद्रीयमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेष पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले होते
bjp
bjpbjp

औरंगाबाद: राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याचा आरोप करत ते पुन्हा मिळवून द्या, अशी मागणी करत कोरोनासंदर्भातील नियमांचा भंग करुन क्रांती चौकात आंदोलन केल्याप्रकरणी भाजपा नेत्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर आंदोलन क्रांती चौकात गुरुवारी (ता.३) करण्यात आले होते.

भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर, ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस भगवान घडमोडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल मकरिये यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांती चौकात हे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनापुर्वी माजी केंद्रीयमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेष पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले.

bjp
अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षण गांभीर्याने घेतले नाही- नरेंद्र पाटील

राज्य सरकारने न्यायलयात ओबीसीच्या आरक्षणाची व्यवस्थित बाजू मांडली नाही, त्यामुळेच ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाले, ओबीसी समाजाला शैक्षणिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या संपवण्याचा डाव आघाडी सरकारचा आहे, असा आरोप आमदार बागडे, आमदार सावे यांनी केला. 'ओबीसी के सन्मान मे भाजप मैदान मे ' यासह विविध घोषणा देत महाविकास आघाडी सरकारच्या निषेध केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com