Chh. Sambhajinagar: केंद्रीय युवक महोत्सवात धक्कादायक घटना! विद्यार्थी भोजनकक्षाचा डोम कोसळला, सुदैवाने कुणी जखमी नाही
Youth Festival 2025: छत्रपती संभाजीनगरच्या केंद्रीय युवक महोत्सवात विद्यार्थ्यांच्या भोजनकक्षाचा डोम पावसामुळे कोसळला. सुदैवाने त्या वेळेस कोणीही डोममध्ये नव्हते; प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था केली.
छत्रपती संभाजीनगर: डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाच्या विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी प्र कुलगुरू निवासस्थान परिसरात उभारलेला डोम रविवारी (ता. २८) पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास कोसळला.