

Certified Seeds
sakal
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियान कडधान्य व तृणधान्य २०२५-२६ अंतर्गत प्रमाणित बियाणे वितरणासाठी छत्रपती संभाजीनगर विभागातील तीनही जिल्ह्यांसाठी टार्गेट देण्यात आले आहे. पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी व बियाणे बदलाचे महत्त्व विचारात घेता सुधारित, संकरीत वाणांच्या प्रसाराच्या दृष्टीने हे टार्गेट देण्यात आल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली.