Municipal Action: चंपा चौक दमडी महल रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली
Anti Encroachment: चंपा चौक ते दमडी महल रस्त्यावर फुटपाथवरील शेड आणि अतिक्रमणे हटवण्यासाठी महापालिकेने कारवाई केली. नागरी मित्र पथक व पोलिसांच्या उपस्थितीत रस्ता मोकळा केला गेला.
छत्रपती संभाजीनगर: महापालिकेच्या प्रभाग तीन कार्यालयाने गुरुवारी (ता. नऊ) जिन्सीतील चंपा चौक ते दमडी महलपर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई केली. दिवसभरात २० अतिक्रमणे काढण्यात आली.