

Chandgude Family Tragedy
esakal
झाल्टा फाटा: चांदगुडे कुटुंबाच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे परिसर हळहळला आहे. दरम्यान, त्यांच्या परतीची वाट पाहणाऱ्या निष्पाप मुक्या जिवाची तळमळ काळजात कालवाकालव करीत आहे. ज्या घरात काल मायेचा पाझर होता, तिथे आज एकाकी पडलेला श्वान हुंदके देत त्याच्या मालकांना शोधत आहे. नियतीने अवघ्या कुटुंबाला क्षणात हिरावून नेल्याची जाणीव त्याला झाली असावी, म्हणूनच की काय हा मुका जीव उपाशीपोटी, अश्रूपूर्ण डोळ्यांनी उंबरठ्याकडे डोळे लावून बसला आहे.