Chandrakant Khaire I हल्ले का होताहेत याचा बंडखोर आमदारांनी विचार करावा, चंद्रकांत खैरेंचा सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant khaire

उठसूठ उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका कशासाठी करता, खैरेंचा सवाल

हल्ले का होताहेत याचा बंडखोर आमदारांनी विचार करावा, चंद्रकांत खैरेंचा सल्ला

उदय सामंत यांच्यावरील हल्ल्याचे समर्थन करणार नाही. पण हल्ले का होत आहेत याचाही बंडखोर आमदारांनी विचार केला पाहिजे. शिवसेनेशी गद्दारी करायची, पुन्हा आमच्या नेत्यांविरुद्ध काहीही बोलायचं हे आता सहन करणार नाही. उठसूठ उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका कशासाठी करता, असा सवाल शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. (Chandrakant Khaire) उदय सामंत यांच्यावरील झालेल्या हल्ल्याबद्दल प्रतिक्रिया देताना त्यांनी टीका केली आहे.

शिंदे गटात सहभागी झालेले उदय सामंत यांच्या गाडीवर काल पुण्यातील कात्रज चौकात हल्ला झाला. त्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत. यावेळी खैर यांनीही बंडखोर आमदारांचे कान टोचले आहेत. आता गेलात ना तिकडे, केली ना गद्दारी मग शांत बसा, शिंदेंची तळी उचला अशा शब्दात त्यांनी बंडखोरांना खडसावलं आहे.

हेही वाचा: सांगली : आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर यांचे अल्पशा आजाराने निधन

ते म्हणाले, शिंदे गटाकडून जशासतसे उत्तर देण्याची भाषा केली जात आहे. तर शिवसेनेकडून आमच्या नेत्यांविरुद्ध बोलाल तर गप्प बसणार नाही, असा इशारा दिला जात आहे. हल्याचे समर्थन करणार नाही, पण हे हल्ले का होतात ? याचा देखील त्यांनी विचार केला पाहिजे. कोणीही उठतो उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करतो हे बरोबर नाही, असंही ते म्हणालेत.

तानाजी सावंत म्हणाले, मी आदित्यला ओळखत नाही. रात्रंदिवस त्यांच्या मागे फिरत होता, आता ओळखत नाही. पण ही गुर्मी पैशाची मस्ती जास्त दिवस चालत नाही, तुमच्याही मागे कधीतरी ईडी लागेल, असा इशाराही खैरे यांनी यावेळी दिला. जे आमदार शिंदे यांच्यासोबत गेलेत त्यांनी आता शांत बसावे, उगाच आमच्या नेत्यांवर टीका करू नये, अन्यथा शिवसैनिक पेटून उठेल, असा इशाराही खैरे यांनी यावेळी दिला.

हेही वाचा: रिकम्या पोटी आल्याचे पाणी पिण्याचे फायदे, पाहा कोणते...

Web Title: Chandrakant Khaire Criticized To Shinde Group And Uday Samant Attack

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..