esakal | 24 x 7 उपलब्ध असणारे चंद्रकांत खैरे नॉट रीचेबल
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

साहेब शहरातच आहेत, पण त्यांनी मोबाईल बंद करून ठेवले आहेत. त्यांनी असे का केले? याबद्दल आम्हाला देखील काही माहिती नाही, पण लवकरच साहेबांचा मोबाईल पुन्हा सुरू होईल असे सांगण्यात येत आहे.

24 x 7 उपलब्ध असणारे चंद्रकांत खैरे नॉट रीचेबल

sakal_logo
By
जगदीश पानसरे

औरंगाबाद : खासदार असताना आणि निवडणुकीत पडल्यानंतरही मतदारसंघातील लोकांना आणि शिवसैनिकांना चोवीस तास फोनवर उपलब्ध असणारे शिवसेनचे नेते चंद्रकांत खैरे शुक्रवारी (ता. १३) सकाळपासून नॉट रिचेबल झाले. त्यांचे फोन बंद येऊ लागल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या.

प्रियांका चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल संतप्त भावना व्यक्त केल्यानंतर चंद्रकांत खैरै काल चर्चेत आले होते. तेव्हापासूनच त्यांना सगळीकडून फोन सुरू झाले असावेत. पण त्यांनी मोबाईल बंद करून टाकले. चाळीस वर्षाच्या राजकीय इतिहासात त्यांचा मोबाईल बंद असण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असेल. राज्यसभेसाठी शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खैरे यांनी अचानक मोबाईल बंद करून ठेवल्यामुळे त्यांचे समर्थक देखील हैराण झाले आहेत. 

खैरे म्हणतात, मी मरेपर्यंत....

शिवसेनेकडून राज्यसभेवर जाण्यास इच्छूक असलेल्या माजी खासदारांच्या यादीत चंद्रकांत खैरे यांचे नाव आघाडीवर होते. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही खैरे यांनी पक्ष-संघटनेच्या कामावर त्याचा परिणाम होऊ दिला नव्हता. उलट नव्या जोमाने खैरे कामाला लागल्याचे चित्र होते. परंतु काल शिवसेनेने प्रियंका चतुर्वेदी या नव्या चेहऱ्याला संधी दिली आणि खैरे नाराज झाले. उघडपणे त्यांनी तसे बोलूनही दाखवले, पण हे सांगत असतांना आपण शिवसेना कधीही सोडणार नाही हे ही स्पष्ट केले. 

रात्री-अपरात्री केव्हाही फोन करा

दोनवेळा आमदार, सलग चारवेळा खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे यांच्या राजकीय वाटचालीत त्यांचा दांडगा संपर्क नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. रात्री-अपरात्री केव्हाही फोन करा ते समोरून उत्तर देणारच असा त्यांचा शिरस्ता राहिला आहे. केवळ मतदारसंघातीलच नाही तर दिल्ली आणि राज्यातील अनेकांना याचा अनुभव आलेला आहे. मी फोनवर चोवीस तास उपलब्ध असतो असा दावा देखील खैरे यांनी अनेकदा आपल्या भाषणातून केलेला आहे. 

तनवाणींनी काय दिलं भाजपला

अगदी बाहेरच्या राज्यात संकटात सापडलेल्या मतदारसंघातील लोकांची मदत, अडचणीतील भाविक, यात्रेकरूना हजारो किलोमीटरवर मदत मिळवून देण्यात खैरे यांचा दांडगा जनसंपर्क आणि ट्वेन्टी फोर बाय सेव्हन फोनवर उपलब्ध असणे याचा महत्वाचा वाटा असायचा.लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही त्यांच्या या संपर्कात खंड पडला नाही. पण आज अचानक शहरात असून देखील चंद्रकांत खैरे यांचे दोन्ही भ्रमणध्वनी हे बंद असल्याचे त्यांच्यांशी संपर्क साधणाऱ्या स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांसह पत्रकारांना देखील अनुभव आला. सरकारनामा प्रतिनिधीने देखील दोनवेळा त्यांच्या दोन्ही क्रमाकांवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर तो स्वीच आॅफ असल्याचे आढळून आले. 

साहेब शहरातच आहेत, पण

खैरे यांच्या सोबत नेहमी सावली सारखे वावरणारे त्यांचे विश्वासू सहकारी यांच्यांशी देखील संपर्क साधला असता साहेबांचा फोन बंद असल्याचे त्यांनी मान्य केले. ते कुठे आहेत याबद्दल विचारले असता साहेब शहरातच आहेत, पण त्यांनी मोबाईल बंद करून ठेवले आहेत. त्यांनी असे का केले? याबद्दल आम्हाला देखील काही माहिती नाही, पण लवकरच साहेबांचा मोबाईल पुन्हा सुरू होईल असे सांगण्यात येत आहे.

loading image