esakal | Video : चंद्रशेखर आझाद यांच्या  हुंकार रॅलीचा घुमला आवाज  
sakal

बोलून बातमी शोधा

photo

भीम आर्मी तर्फे सीएए, एनआरपी, एनआरसी कायद्यांच्या विरोधात जनजागृतीचा भाग म्हणून भीम आर्मीचे नेते अँड. चंद्रशेखर आझाद रावण यांनी शहरात रविवारी (ता. २३) काढलेल्या हुंकार रॅलीने लक्ष वेधले. 

Video : चंद्रशेखर आझाद यांच्या  हुंकार रॅलीचा घुमला आवाज  

sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद : भीम आर्मी तर्फे सीएए, एनआरपी, एनआरसी कायद्यांच्या विरोधात जनजागृतीचा भाग म्हणून भीम आर्मीचे नेते अँड. चंद्रशेखर आझाद रावण यांनी शहरात रविवारी (ता. २३) काढलेल्या हुंकार रॅलीने लक्ष वेधले. 

चंद्रशेखर आझाद सुभेदारी विश्रामगृहातुन पायीच पदयात्रे द्वारे कार्यकर्त्यांना घेऊन भडकल गेट येथे सकाळी बारा वाजता पोहोचले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर रँलीमध्ये वाहनात बसण्याऐवजी पायी जाणे त्यांनी पसंत केले. 

हेही वाचा : एमआयएमच्या खासदारांना इतकं भडकायला काय झालं : पहा Video  

घोषणांनी परिसर दुमदुमला

चंद्रशेखर आजाद तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, भारतीय संविधान जिंदाबाद, चंद्रशेखर आजाद तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. 

हेही वाचा : योगी ठाकूर यांना ही जाब विचारा  - इम्तियाज जलील  

शहरात पुतळ्याला अभिवादन 

भडकल गेट येथुन निघालेली ही रँली मिलकॉर्नर येथील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून, औरंगपूरा मार्गे महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाता फुले यांना अभिवादन करून, वि. दा. सावरकर चौक मार्गे सिल्लेखाना सिग्नल, क्रांती चौक, सिडको बस स्टँड मार्गे, टीव्ही सेंटर येथे पोहचली. या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून, सलीम अली सरोवर, जिल्हाधिकारी कार्यालयापासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून सुभेदारी विश्रामगृह येथे रॅलीचा समारोप झाला. 

हेही वाचा - तुमचा विवाह कधी झालाय...बघा जमतेय का काही...  

आंदोलन करणे हा संविधानिक अधिकार 

देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून औरंगाबादेत आलो आहे. आंदोलन करणे हा आमचा संविधानिक अधिकार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेने प्रत्येकाला आपला आवाज बुलंद करण्याचा अधिकार आहे. आम्ही संविधानिक पध्दतीने शांततामय आंदोलन करत आहोत. या आंदोलनाच्या माध्यमाने आमचा आवाज सरकारपर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे.  
 

loading image
go to top