शिवसेनेचे माजी महापौर राजेंद्र जंजाळांविरोधात गुन्हा दाखल

शिवसेना
शिवसेनाsakal

औरंगाबाद : लसीकरण केंद्रावर लस (Corona Vaccination Site) घेण्याच्या प्रकरणावरुन शिवसेना-भाजपमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार सोमवारी (ता.२६) समोर आला होता. त्यातून जवाहरनगर पोलीस ठाण्यासमोर भाजपकडून (BJP) माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळांसह (Rajendra Janjal) शिवसेना (Shiv Sena) कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत ठिय्या आंदोलनही करण्यात आले होते. सोमवारी रात्री प्रा. गोविंद केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अखेर (Aurangabad) जवाहरनगर पोलीस ठाण्यात माजी उपमहापौर जंजाळ, कार्यकर्ता अमोल पाटे, आकाश राऊत आणि आठ ते दहा कार्यकर्त्यांविरुध्द मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रा. गोविंद परशुराम केंद्रे (५०, रा. ६९, शिवनेरी कॉलनी, बाळकृष्णनगर, गारखेडा) यांच्या तक्रारीनुसार, २६ जुलैरोजी सकाळी विजयनगरातील महापालिका आरोग्य केंद्रात कोवीड लसीकरण सुरु होते.(charge filed against former shiv sena deputy mayor rajendra janjal in aurangabad glp88)

शिवसेना
मरणार असलो तरी तुम्ही चांगले जगा! मित्रांना पाठवला शेवटचा निरोप

पत्नी माजी नगरसेविका असल्याने प्रतिनिधी म्हणून आपण लसीकरण केंद्रावर गेलो होतो. दरम्यान, मागील आठवड्यापासून जंजाळ यांचे कार्यकर्ते अमोल पाटे, आकाश राऊत व इतर आठ ते दहा जण दररोज लसीकरण केंद्रावर येऊन आपापल्या ओळखीच्या लोकांना बेकायदेशीररित्या रांगेत उभे करत होते. त्यावेळी या कार्यकर्त्यांनी रांगेत उभे असलेल्या नागरिकांना अरेरावी करून आम्ही जंजाळ साहेबांचे कार्यकर्ते आहोत, असे म्हणून दादागिरीला सुरुवात केली. तसेच लसीकरण केंद्रावर बार, तंबाखू खाऊन कोठेही थुंकणे, मोठमोठ्याने गोंधळ घालणे असे प्रकार करत होते. मी त्यांना दररोज असे प्रकार करु नका. येथे महिला, ज्येष्ठ नागरिक असल्याने वाईट वागू नका असे म्हणायचो. मात्र, ते मला लसीकरण केंद्र तुमच्या मालकीचे आहे का? आम्ही काहीही करू तुम्ही आम्हाला बोलणारे कोण, असे म्हणून धमकावू लागले. आपण त्यांना समजावण्यास गेलो असता त्यांनी फोन करून जंजाळ यांना लसीकरण केंद्रावर बोलावून घेतले. तेथे मी व माझा पुतण्या धीरज केंद्रे यांच्यासोबत जंजाळ व त्यांच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची सुरु झाली. त्यानंतर जंजाळ आणि मी चहा घेण्यासाठी त्यांच्या कारमध्ये बसलो.

शिवसेना
पोलिस ठाण्यात चोरीची वाहने विकत घेण्यासाठी नागरिकांची गर्दी

तेव्हा जंजाळ यांनी मला फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे (Cabinet Minister Sandipan Bhumare) यांच्या सुतगिरणी चौकातील कार्यालयात नेले. तेथे भुमरे हे कामात असल्याने मी कार्यालयाबाहेर आलो. मी बाहेर उभा असताना पाठीमागून डाव्या खांद्याच्या खालच्या बाजूला पाठीत कोणीतरी जोरात दोन-चार बुक्के मारले. त्यावेळीच समोर उभ्या असलेल्या ३०-३५ वयाच्या एका कार्यकर्त्याने शिवीगाळ केली. तसेच कानशिलात लगावल्या. त्यामुळे मी जमिनीवर कोसळलो. त्यात पाठीला मुकामार लागल्याने बेशुध्द पडलो. त्यानंतर मला रुग्णालयात कोणी नेले हे माहिती नाही. तरी माझे अपहरण करुन प्राणघातक हल्ला करणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे प्रा. केंद्रे यांनी म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक भारत पाचोळे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com