नमाजच्या वेळी गाणे वाजवले, रेल्वे सुरक्षा बलाच्या उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल | Aurangabad Latest News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

नमाजच्या वेळी गाणे वाजवले, रेल्वे सुरक्षा बलाच्या उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

औरंगाबाद : मशिदीच्या दिशेला स्पीकर लावून अजानच्या वेळी मोठ्या आवाजात गाणे वाजवल्याच्या प्रकरणात रेल्वे सुरक्षा बलाच्या उपनिरीक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्लीम बांधवांच्या अजानच्या वेळी २३ एप्रिल रोजी रात्री साडेसात वाजता औरंगाबाद (Aurangabad) येथील सिल्कमिल कॉलनी परिसरातील अमृतसाई प्लाझा सोसायटीमधील घरातून मोठ्या आवाजात गाणे वाजवण्यात येत होते. त्यावेळी पोलिसांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर सातारा पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (Charge Filed Against PSI In Aurangabad For Playing Song While Ajaan)

हेही वाचा: कलियुगच्या या राजाने...अमृता फडणवीस यांची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका

त्यावेळी येथील रहिवाशी आणि रेल्वे सुरक्षा बलाचे परळी येथील उपनिरीक्षक किशोर गंडप्पा मलकुनाईक यांच्या बिल्डींग नं. सी विंग मधील तिसऱ्या मजल्यावरुन घराचे खिडकीमध्ये लाऊड स्पिकर मशिदीच्या दिशेने ठेवून लाऊड स्पिकरचा आवाज मोठा येत होता. दरम्यान सदर ठिकाणी तणाव पूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

हेही वाचा: औरंगाबादेत तरुणाला बेदम मारहाण करुन खून, निर्दयी घटनेचा व्हिडिओ आला समोर

त्यामुळे सातारा पोलिस ठाण्याचे जमादार कारभारी नलावडे यांच्या तक्रारीवरुन उपनिरीक्षक मलकुनाईक यांच्या विरोधात नमाजच्या वेळी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या दृष्टीने समाजामध्ये अशांतता निर्माण होईल असे वर्तन केल्याच्या आरोपावरुन सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नीचा वाढदिवस असल्याने शनिवारी सायंकाळी घरातल्या घरात ब्लुटूथवर कनेक्ट होणारे स्पीकर लावले होते. शिवाय स्पीकर माझ्या पत्नीने लावले होते. मी लावले नव्हते. यात कोणाच्याही धार्मिक भावना दुखविण्याचा उद्देश नव्हता.

- के. मलकुनाईक, रेल्वे सुरक्षा बल

Web Title: Charge Filed Against Psi In Aurangabad For Playing Song While Ajaan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Aurangabad NewsPSI
go to top