
तुळजापूर : तुळजापूर पो.नवगांव वय ५५ वर्ष व्यक्तीचा मृत्यू झाला; मात्र गावात स्मशानभूमीसाठी स्वतंत्र जागा नसल्याने आणि सध्याच्या अंतविधी ठिकाणी जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याने संतप्त समाजबांधवांनी मृतदेहासह ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या दिला. या हृदयद्रावक प्रसंगाने संपूर्ण नवगाव हादरून गेले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.