
छत्रपती संभाजीनगर : शहरात नोकरी, व्यवसायानिमित्त एकल राहणाऱ्या महिलांच्या सोयीसाठी नक्षत्रवाडी व चिकलठाणा येथे केंद्र शासनाच्या निधीतून वसतिगृह बांधले जाणार आहेत. त्यासाठी ४६ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे, या कामाचा कार्यारंभ आदेश कंत्राटदाराला देण्यात आला. याठिकाणी २४० महिलांच्या निवासाची व्यवस्था होणार आहे.