Chh. Sambhajinagar: अल्पवयीन मुलाचे अपहरण करून हाताला चटके; वाळूजमध्ये नशेखोरांचा उच्छाद, महिला, मुली, ज्येष्ठांना रोजचाच त्रास
Chhatrapati Sambhajinagar Crime: वाळूज सिद्धिविनायक मंदिर परिसरात अल्पवयीन मुलाचे अपहरण, हातावर चटके; नशेखोरांवर नागरिकांचा रोष. एमआयडीसी पोलिसांनी तपास सुरू केला, नागरिकांनी तात्काळ सुरक्षा वाढवण्याची मागणी केली.
बजाजनगर, ता. २३ (बातमीदार) : अल्पवयीन मुलाचे अपहरण करून नशेखोरांनी त्याच्या हाताला लाइटरने चटके दिल्याचा गंभीर प्रकार वाळूज महानगरातील सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसरात तीन दिवसांपूर्वी उघडकीस आला.