
छत्रपती संभाजीनगरला बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपलं. वादळी वाऱ्यामुळे धुळीच्या वादळात शहर हरवलं होतं. यातच सिद्धार्थ उद्यानात प्रवेशद्वाराची भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली. यात दोन महिलांचा मृत्यू झाला असून त्या उद्यानात कर्मचारी होत्या.