

हैदराबादहून शिर्डीला दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गाडीचा बुधवारी अपघात झाला होता. यात ४ जणांचा मृत्यू झाला होता तर ११ जण जखमी झाले होते. अपघातानंतर सर्वांना छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर इथं सरकारी रुग्णालयात आणले होते. त्यावेळी मृत महिलांच्या अंगावरील सोने आणि पैसे चोरण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाल्ल्याचा हा प्रकार समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.