Baba Farjan Dordi : बाबा फर्जनच्या घरातून जप्त केली सव्वा पाच कोटींची 'माया'; पण ती मोजताना बँक कर्मचारी अन् पोलिसांची का झाली दमछाक? बंगल्यावर रायफल, 6 हजार काडतूसंही सापडली

Baba Farjan Dordi cash seizure : छत्रपती संभाजीनगरातील बाबा फर्जन दोरडीच्या बंगल्यावर जप्त केलेली सव्वापाच कोटी रुपयांची रोकड न्यायालयाच्या आदेशानुसार कडेकोट पोलिस बंदोबस्तात बँकेत जमा करण्यात आली. रोकड मोजण्यासाठी अनेक तास लागले.
Baba Farjan Dordi ₹5.25 crore cash seizure

Baba Farjan Dordi ₹5.25 crore cash seizure

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : जुन्या शहरातील जुना डॉन बाबा फर्जन दोरडी याच्या मिटमिट्यातील बंगल्यावर सापडलेली रोख सव्वा पाच कोटी रुपये पोलिस ठाण्यातून एका बँकेत जमा करण्यात (Chhatrapati Sambhajinagar crime news) आली. आयुष्यभर बाबाने जमवलेली माया मोजताना बँकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही दमछाक झाली. एवढी मोठी रोख नेणे आणि मोजणे जोखमीचे असल्याने बंदोबस्तावर असलले आरसीबी, गुन्हे शाखा आणि छावणी पोलिस ठाणे अशी तीन पथके, चार अधिकाऱ्यांसह ४० कर्मचारी अक्षरशः कंटाळून गेल्याचे पाहायला मिळाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com