Massive protest erupts at BJP office in Chhatrapati Sambhajinagar
esakal
राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र, त्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा झाला आहे. निष्ठावंतांना डावलून नवीन आलेल्या माणसांना उमेदवारी दिल्याचा आरोप करत भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शेकडो कार्यकर्ते पेट्रोल कॅनसह या ठिकाणी पोहोचले असून या कार्यकर्त्यांकडून वरिष्ठ नेत्यांना जाब विचारण्यात येतो आहे. यावेळी भाजपाचे नेते अतुल सावे यांच्या कार्यालयाबाहेर नारज पदाधिकाऱ्यांनी घेराव घातला आहे.