Chh. Sambhajinagar Accident: कार रिक्षा अपघातात दोन ठार; गर्भातील बाळही गेले, मोंढा नाका उड्डाणपुलावरील घटना
Fatal Car–Rickshaw Collision in Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये कार-रिक्षा भीषण अपघातात तरुण व पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू. गर्भवती महिलेचा गर्भही दगावला; चौघे जखमी.
छत्रपती संभाजीनगर : एका कारने सिटर रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षा उलटून त्यातील एका २२ वर्षीय तरुणासह पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला, तर चौघे जखमी झाले. ही घटना शनिवारी (ता. २१) मध्यरात्री घडली.