Chhatrapati Sambhajinagar News : पंडित धीरेंद्र शास्त्रींचे छत्रपती संभाजीनगर शहरात स्वागत

आजपासून पंडित धीरेंद्र शास्त्री यांचा शहरात श्रीराम, हनुमान कथा सोहळा, दरबार
Pandit Dhirendra Shashtri
Pandit Dhirendra Shashtrisakal

छत्रपती संभाजीनगर - ‘सियावर रामचंद्र की जय, जय श्रीराम, पवनसूत हनुमान की जय’ असा जयघोष करीत बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांचे रविवारी (ता.पाच) सकल हिंदू जनजागरण समितीने स्वागत केले. चिकलाठाणा विमानतळ ते सिडको एन-३ दरम्यान वाहन फेरी काढण्यात आली. रस्त्यात ठिकठिकाणी त्यांचे भक्तांनी स्वागत केले.

सकल हिंदू जन जागरण समितीतर्फे ६ ते ८ ऑक्टोबर दरम्यान बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या वाणीतून श्रीराम कथा, हनुमान कथा आणि दिव्य दरबार होणार आहे. धीरेंद्र शास्त्री रविवारी रात्री साडेआठ वाजता शहरात झाले. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. सुरक्षेसाठी पोलिसांसह ५० बाउंन्सर तैनात होते.

काही तरुण ढोल ताशा घेऊन तरुण आले होते. पंडित धींरेंद्र शास्त्री यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी आणि त्यांचा व्हिडिओ काढण्यासाठी अनेकांची धडपड दिसून आली. तरुणांचा एवढा उत्साह होत की, काही तरुण बॅरिकेट्सवर चढले. सिडकोतील वसंतराव नाईक चौकात दोन जेसीबी लावून पंडित धीरेंद्र यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. वाहनफेरीत पाचशेहून अधिक दुचाकीस्वार यात सहभागी झाले होते.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाला उपस्थित भाविक, लहान मुले, वयोवृद्ध आदींच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी विशेष बंदोबस्त तैनात केला आहे. वाहतुकीसाठी एक सहायक पोलिस आयुक्त, चार पोलिस निरीक्षक, सात सहायक, ४७ पोलिस कर्मचारी तसेच पाच पोलिस निरीक्षक ११ व १११ पोलिस अंमलदार अयोध्यानगरी परिसरात असणार आहे.

असे आहेत कार्यक्रम

सोमवारी सकाळी दहा वाजता क्रांती चौकातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अयोध्यानगरीपर्यंत कलश यात्रा काढण्यात येणार आहे. दरम्यान, छत्रपती शिवराय आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे. दुपारी ३ वाजता कथा सोहळा होईल. मंगळवारी (ता. सात) दुपारी १२ वाजता दरबार होईल. बुधवारी (ता. आठ) कथेचा सोहळा आणि समारोप होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com