Chhatrapati Sambhajinagar Police : शहर पोलिस दलाने कात टाकली पण.....

शहर पोलिस दलाने तपासाकामी, सुरक्षेचे एक अंग म्हणून ड्रोन खरेदी केले. शहरातील संवेदनशील पोलिस ठाण्याच्या हद्दीत ड्रोन पेट्रोलिंग सुरुही केली.
City Audit
City Auditsakal

शहर पोलिस दलाने तपासाकामी, सुरक्षेचे एक अंग म्हणून ड्रोन खरेदी केले. शहरातील संवेदनशील पोलिस ठाण्याच्या हद्दीत ड्रोन पेट्रोलिंग सुरुही केली. मात्र, बनावट नोटा प्रकरणातील किरकोळ बाबींकडे दुर्लक्ष करणे भोवल्यामुळे पोलिसांना टीकेचे धनी व्हावे लागले. इतकेच नव्हे, तर आता पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

१९ ऑक्टोबररोजी छावणी पोलिसांनी कर्णपुरा यात्रेत बनावट नोटा चालविणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला पकडले होते. विशेष म्हणजे, स्थानिक दुकानदारांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी हा विषय पोलिसांपर्यंत पोचविला खरा, मात्र पोलिसांनी ‘व्हेरिफाय’ करण्याच्या नावाखाली त्या मुलाला दुर्लक्षित केले. इतकेच नव्हे, तर ‘त्या’ मुलानेही ‘अल्पवयीन कार्ड’ वापरत मी नोटा बनवित नाही.

माझ्याकडे ‘कुणीतरी’ ठेवण्यासाठी दिल्या होत्या असे सांगत पोलिसांच्या ताब्यातून सहीसलामत सुटला. परंतू १९ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर तब्बल सहा दिवस २४ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या कर्णपुरा यात्रेत मुख्य आरोपी राहुल जावळे याने विविध अल्पवयीन मुलांच्या माध्यमातून कितीतरी बनावट नोटा चालविल्या असतील याची कल्पना न केलेलीच बरी. यात्रा म्हटले की बंदोबस्त, धावपळ एकंदरीतच मनस्तापही आलाच.

पण याचा अर्थ एखाद्या गुन्हेगाराकडे सपशेल दुर्लक्ष करुन चालेल काय? असा सवाल उपस्थित झाल्यावर त्याची जबाबदारी पोलिस दलाने झटकून चालणार नाही. शहर पोलिस दल नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. परंतू प्रत्येक गोष्टी चव्हाट्यावर आल्यानंतर तरी पोलिस दल यातून धडा घेणार की नाही हा मात्र अनुत्तरीतच राहतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com