

Cyber Fraud
sakal
छत्रपती संभाजीनगर : पार्ट टाइम नोकरी देण्याच्या आमिषाने चक्क एका राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या रिलेशनशिप मॅनेजरला चौघा सायबर भामट्यांनी तब्बल २६ लाख ७३ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला. ही घटना २४ नोव्हेंबर ते पाच डिसेंबरदरम्यान हडकोत घडली. विशेष म्हणजे, मॅनेजरने उसणे पैसे घेऊन भरल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी चौघांविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.