

Cyber Fraud
sakal
छत्रपती संभाजीनगर : शेअर मार्केटमधील गुंतवणूक, अधिक परतावा, लाइक केल्यास पाँइट अशा विविध आमिषाच्या बळावर ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या सायबर चोरांनी शहरात वर्षभरात तब्बल ९ कोटी ६२ लाख रुपये लाटले. या प्रकरणात ४० गुन्हे नोंद आहे. कमी वेळात जास्त नफा कमावण्याचा मोह उच्चशिक्षितांना लक्ष्य करीत आहेत.