Chhatrapati Sambhajinagar DCC Bank Chairman Election
esakal
छत्रपती संभाजीनगर : सुमारे साडेचार हजार कोटींचे भागभांडवल असलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अखेर ‘ठाणे पॅटर्न’नुसार भाजपला शिवसेनेच्या ताब्यात द्यावी (Vilas Bhumare elected DCC Bank Chairman) लागली. रविवारी (ता. १९) रात्री उशिरापर्यंत चाललेल्या मंथन बैठकीनंतर बँकेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार विलास भुमरे, तर उपाध्यक्षपदी भाजपचे रामूकाका शेळके यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.