Chh. Sambhajinagar Drug Case : मेंदू सुन्न करणारे बटण; ‘ओव्हर डोस’ने व्यक्ती ‘सायकोसिस’, वाढते गुन्हेगारी प्रवृत्ती

व्यसनासाठी वापरल्या जाणारे ‘बटण’चा ‘ओव्हर डोस’ व्यक्तीच्या मेंदूचा ताबा घेते. यामुळे विचार करण्याची क्षमता जाते किंवा कमी होते.
Chh. Sambhajinagar Drug Case
Chh. Sambhajinagar Drug CaseSakal

- सचिन पवार

छत्रपती संभाजीनगर : व्यसनासाठी वापरल्या जाणारे ‘बटण’चा ‘ओव्हर डोस’ व्यक्तीच्या मेंदूचा ताबा घेते. यामुळे विचार करण्याची क्षमता जाते किंवा कमी होते. अशा व्यसनाधीन लोकांना भास व्हायला लागतात. याला ‘सबस्टेंड एण्ड्युस सायकोसिस’ म्हणतात. यातूनच या व्यसनाधीन लोकांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते, असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मेराज कादरी यांनी सांगितले.

हल्ली नशेच्या धुंदीत जाण्यासाठी ‘बटण’, ‘ऑरेंज’ यासारख्या टॅबलेटचा वापर केला जातो. या टॅबलेटचा वापर करणाऱ्यांची संख्याही आता फार मोठी झाली आहे. यातूनच हे ‘बटण प्लेअर’ गुन्हेगारीकडे वळतात. शहर पोलिस दलाच्या वार्षिक अहवालात (वर्ष २०२२) जवळपास ८० टक्के गुन्हे हे नशेत होत असल्याचे समोर आले.

यामुळे हे ‘बटण प्लेअर’ समाज व्यवस्थेसाठी किती घातक आहेत हे लक्षात येते. त्यात सतत बटणच्या ओव्हर डोसमुळे ही व्यक्ती ‘सबस्टेंड एण्ड्युस सायकोसिस’ग्रस्त होते. यात तिला विविध भास व्हायला लागतात. दोन लोक आपसात बोलत असले तर ते आपल्याच विरोधात बोलतात अशी शंका त्यांच्या मनात येते. त्यामुळे त्यांचा स्वभाव आक्रमक, हिंसक होतो. मेंदूची विचार करण्याची क्षमता कमी होते. त्यातूनच त्यांच्या हातून गुन्हेगारी कृत्य घडतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com