Chhatrapati Sambhajinagar News
esakal
छत्रपती संभाजीनगर : मनपाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे घर सोडावे लागलेल्या एका तरुण शेतकऱ्याने (Chhatrapati Sambhajinagar Farmer) मळ्यात गळफास घेतल्याने संतापलेले नातेवाईक आणि गावकऱ्यांनी त्याच्या मृतदेहासहित चिकलठाण्याच्या (Chhatrapati Sambhajinagar Protest News) चौकात ठिय्या आंदोलन केले. अडीच तास चाललेल्या या आंदोलनामुळे जालना रोडच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.