Chhatrapati Sambhajinagar News : शहरात पाचशे चारचाकी, तीन हजार दुचाकी घरादाराची वाढविणार शोभा

दिवाळी पाडव्याला शहरातील जवळपास साडेतीन हजार घरांसमोर नव्या कोऱ्या लखलखत्या कार, डौलदार दुचाकी उभ्या राहणार आहेत.
New Vehicle
New VehicleSakal

छत्रपती संभाजीनगर - दिवाळी पाडव्याला शहरातील जवळपास साडेतीन हजार घरांसमोर नव्या कोऱ्या लखलखत्या कार, डौलदार दुचाकी उभ्या राहणार आहेत. पाचशे घरांची चारचाकी तर साडेतीन हजार घरांची दुचाकीने शोभा वाढणार आहे. यंदा बाजारपेठेसाठी दसरा लाभदायी राहिला होता. तसाच साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला दिवाळी पाडवा बाजारपेठेला सुमारे पाचशे कोटींची भरारी देणारा ठरणार आहे. ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट, सोने-चांदी आणि रियल इस्टेटसाठी दिवाळी लकी ठरली आहे.

गेल्या दोन दिवासांत बाजारपेठेत दोनशे कोटींची उलाढाल झाली. पाडव्याच्या मुहुर्तावर नवीन वाहन, सोने-चांदी, घर खरेदी करणे शुभ असल्याने आणखी मोठी उलाढाल होणार आहे. कापड मार्केटमध्ये गेल्या चार दिवासापासून कोट्यवधीची उलाढाल दिसून आली. कपडा मार्केटमध्ये पाडव्याच्या मुहुर्तावर पाच ते सात कोटीची उलाढाल अपेक्षित असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

१५० कोटींच्या वाहनांची होणार विक्री

वाहन बाजारात मोठी तेजी दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांत सव्वा चारशे चारचाकी आणि दोन हजार दुचाकीची विक्री झाली. मंगळवारी पाडव्याच्या मुहुर्तावर ५०० चारचाकी व तीन हजार दुचाकींची विक्री होणार आहे. यात ५० इलेक्ट्रॉनिक्स व हायब्रीड वाहनांचा समावेश असणार आहे. एक हजार इलेक्ट्रॉनिक्स दुचाकींची विक्री होणार आहे. यात अनेक वाहनांना एक ते तीन महिन्यांची वेटिंग आहे. नामांकित वाहनांना ही वेटिंग असल्याची माहिती सानिया मोर्टसचे संचालक सचिन मुळे यांनी दिली.

इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये ५० कोटींची उलाढाल

दिवाळीत पहिल्या दिवासापासून इलेक्ट्रॉनिक्स दकानांमध्ये खरेदीसाठी तोबा गर्दी होत आहे. गेल्या चार दिवसांत व उद्याच्या पाडवा असे सर्व मिळून ५० ते ७० कोटींची उलाढाल अपेक्षित आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये प्रामुख्याने एलएडी टिव्ही, वॉशिंग मशीन, मोठे फ्रीज या वस्तूंना सर्वांधिक मागणी असल्याची माहिती सानिया एलजीचे संचालक पंकज अग्रवाल यांनी सांगितले. दसऱ्याला ३० ते ४० कोटींचा उलाढाल जिल्ह्यात झाली होती. दिवाळीत ती आणखी वाढणार आहे.

१५ कोटींचे दागिने नागरिक करणार खरेदी

दिवाळी सुरू झाल्यापासून सोने खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. सोमवारी सोने ६० हजार ५०० रुपये तोळा, तर चांदी ७२ हजार रुपये किलो असा दर होता. पाडव्याच्या मुहुर्तांवर १० ते १५ कोटींची उलाढाल अपेक्षित असल्याचे सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडिलक यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com