
छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. देवळाई रोडवर झालेल्या या स्फोटानंतर आगीचा मोठा भडका उडाला. यामध्ये देवळाई रोडवरची सहा दुकानं जळून खाक झाली आहेत. सोमवारी घडलेल्या या घटनेत रहिवाशांच्या सतर्कतेमुळं जीवितहानी टळलीय. दरम्यान, आगीच्या कारणाबाबत अग्निशमन दल, महावितरण आणि प्रशासनाकडून वेगवेगळे दावे करण्यात आल्याची माहिती समजते.