High Court Clerk Exam Chaos in Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगरमध्ये हायकोर्टाच्या लिपिक पदासाठी सुरू असलेल्या ऑनलाइन परीक्षेदरम्यान गोंधळ निर्माण झाला आहे. परीक्षा केंद्रावरील तांत्रिक अडचणी आणि गैरव्यवस्थेचा आरोप करत विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी बोलावण्यात आले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज या पदासाठी परीक्षा घेतली जात असून, विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अभिजीत दिपके विद्यार्थ्यांच्या भेटीला पोहोचले आहेत.