Chhatrapati Sambhajinagar News
sakal
छत्रपती संभाजीनगर
Chhatrapati Sambhajinagar News: खोट्या कागदपत्रांवरून जन्म प्रमाणपत्र; संभाजीनगरात २९ जणांवर गुन्हा दाखल
Fake Birth Certificates in Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये खोट्या जन्मतारखा व पुराव्यांच्या आधारे २९ जणांविरोधात फसवणुकीची कारवाई करण्यात आली. लातूर तहसील कार्यालयात १,९४६ जन्म प्रमाणपत्रे रद्द केली गेली.
छत्रपती संभाजीनगर : खोट्या जन्मतारखा, जन्मस्थळ, शपथपत्र, जन्माचे खोटे पुरावे देऊन विलंबाचे जन्म प्रमाणपत्र मिळविले. या माध्यमातून शासनाची फसवणूक केल्याने सिटी चौक पोलिस ठाण्यात २९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ऑगस्ट २०२३ ते एप्रिल २०२५ दरम्यान घडली.

