Marriage Fraud : विवाह होऊन घरी जाताच ‘नवरी’ पहाटेच पसार ,तरुणाची पाच लाखांची फसवणूक; मध्यस्थाला अटक

Chha.Sambhajinagar Marriage Fraud : लग्नासाठी स्थळ दाखवून पाच लाख रुपये घेतल्यानंतर बनावट विवाह लावल्याचा आरोप आहे. घरी पोहोचल्यानंतर पहाटेच नवरी पसार झाली; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
A marriage fraud case involving a bride who allegedly fled hours after the wedding has been registered in Chhatrapati Sambhajinagar.

A marriage fraud case involving a bride who allegedly fled hours after the wedding has been registered in Chhatrapati Sambhajinagar.

esakall

Updated on: 

​छत्रपती संभाजीनगर: ‘लग्नासाठी मुलगी आहे’ म्हणत मुलाचे घर, शेती पाहिली. मुलगीही दाखविली, पैशासंबधी बोलणी झाल्यावर पहिली ‘बोगस’ असल्याचे सांगत दुसरी मुलगी दाखविली. पसंती झाली अन् वधू-वर एकमेकांच्या गळ्यात हार घालत रेशीमगाठीत गुंतले. लग्न आटोपून रात्री उशिरा वऱ्हाड घरी पोचून दोन तास उलटण्याच्या आतच नवरी पसार झाली. या प्रकाराबाबत मध्यस्थीला कल्पना दिली तर त्याने पुन्हा ‘दुसरी पाहतो’ अशी बतावणी केली. औटघटकेच्या या संसारात जालन्यातील तरुणाची पाच लाखांची फसवणूक झाली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध बेगमपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

Advance Crop Loss Compensation Update
Water tankers arranged to supply drinking water to villages facing potential water scarcity in Chhatrapati Sambhajinagar district.
Chhatrapati Sambhajinagar News 32 Year Old Farmer from Kannad Taluka Dies During Treatment at Ghati Hospital
Nashik Crime Bhondubaba Defrauded Women