Property Tax: नव्या २२ हजार मालमत्तांकडे तब्बल थकले ५० कोटी! २०२२ नंतर लागलेला कर भरण्यास टाळाटाळ
Chhatrapati Sambhajinagar: महापालिकेने २०२२ नंतर २२ हजार नवीन मालमत्तांना कर आकारणी केली असून, त्यांच्याकडे ५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेतर्फे ‘शास्ती से आझादी’ मोहीम राबविण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : शहरातील २२ हजार मालमत्तांना २०२२ नंतर महापालिकेने कर आकारणी केली. त्यांच्याकडे तब्बल ५० कोटी रुपये थकले आहेत. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेतर्फे प्रयत्न केले जाणार आहेत.