

Winter Shopping
sakal
छत्रपती संभाजीनगर : हिवाळा सुरू होताच शहरात विविध ठिकाणी छोटे-मोठे विक्रेते स्वेटर आणि हिवाळी कपड्यांची विक्री सुरू करतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील तिबेटी स्वेटर बाजाराने थंडीच्या हंगामाची चाहूल लागल्याची जाणीव करून दिली आहे. मागील ३० वर्षांपासून हिवाळी कपड्यांच्या विक्रीत अव्वल मानला जाणारा हा बाजार यंदाही सुरू झाला असून ग्राहकांनी खरेदीस सुरवात केली आहे.