छत्रपती संभाजीनगर - शहराच्या पाणी पुरवठ्यावरील संकटांची मालिका कायम आहे. वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असतानाच शुक्रवारी (ता. १३) पहाटे ४.२५ वाजता फारोळा येथील पंपगृहात एका उंदरामुळे स्पार्क होऊन १२०० मिलिमीटर व्यासाच्या पाइपलाइनचा पाणी पुरवठा बंद झाला.