दीड वर्षात चिकनचे दर झाले दुप्पट; विक्रमी २६० ते २८० रुपये किलो

कोरोनाच्या पहिल्या लाटेत पोल्ट्री चालकांना कोंबड्या फेकून द्याव्या लागल्या होत्या तर कित्येकांना फुकटात वाटप कराव्या लागल्या.
Chicken Price Updates
Chicken Price UpdatesSAKAL

औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या लाटेत पोल्ट्री चालकांना कोंबड्या फेकून द्याव्या लागल्या होत्या तर कित्येकांना फुकटात वाटप कराव्या लागल्या. मात्र आता दीड वर्षानंतर चिकनचे दर दुप्पट झाले असून विक्रमी २६० ते २८० रुपये प्रती किलोने विक्री होत आहे. दीड वर्षापुर्वी हेच दर १२० ते १४० रुपये प्रती किलोपर्यंत होते. (Chicken Price Updates)

दीड वर्षापूर्वी चिकनचे दर १२० ते १४० रुपये किलोपर्यंत असायचे. उत्पादन आणि मागणी यामध्ये जास्त फरक नसल्याने किंमती सुद्धा स्थिर राहत होत्या. मात्र लॉकडाऊन मध्ये अनेक पोल्ट्री चालकांना फटका बसल्याने त्यांना पोल्ट्री बंद कराव्या लागल्या. काही जण कर्जबाजारी झाल्याने ते पुन्हा या व्यवसायाकडे वळले नाही. त्यातच पोल्ट्रीसाठी लागणारे खाद्याचे दर दुप्पट झाले, पक्षाच्या किंमती वाढल्याने पोल्ट्री चालक अडचणीत आले आहे. नाईलाजाने त्यांना कोंबडीचे दर वाढवावे लागले आहे. पुर्वी ८० ते ९० रुपयांना मिळणारी जिवंत कोंबडी आज १५० रुपये प्रती किलो दराने खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे विक्रेते चिकन २६० ते २८० रुपये प्रती किलो दराने विक्री केले जात आहे. औरंगाबाद शहरात नगर, येवला, मनमाड, पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कोंबड्या विक्रीस येतात मात्र येथेच पोल्ट्रीचे उत्पादन कमी झाले तर दुसरीकडे मागणी कायम असल्याने दर कमी होण्याऐवजी वाढत आहे.

गावरानचे दर कायम

बॉयलर चिकनचे दर वाढत असतांना दुसरीकडे गावरान चिकन (जिवंत कोंबडा) ५०० रुपये किलो दराने विक्री होत आहे तर डुप्लीकेट गावरान म्हणून संबोधले जाणारे जिवंत कोंबडे २८० रुपये प्रती किलो दराने विक्री होत आहे.

सध्या मार्केटमध्ये चिकनचा तुटवडा आहे. हॉटेल चालक, ग्राहकांनाकडून मागणी कायम आहे. मार्केटमध्ये आवक कमी आणि मागणी कायम असल्याने दर वाढत चालले आहे. आम्हाला सध्या जिवंत बॉयलर कोंबडी १५० रुपये प्रती किलोने खरेदी करावी लागत आहे. पूर्वी हीच कोंबडी ८० ते ९० रुपये किलो होती.

-बाबूभाई, चिकन विक्रेते, मध्यवर्ती जकात नाका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com