esakal | अतिवृष्टीसाठी मुख्यमंत्री देतील वेगळा निधी : अब्दुल सत्तार
sakal

बोलून बातमी शोधा

 abdul sattar

अतिवृष्टीसाठी मुख्यमंत्री देतील वेगळा निधी : अब्दुल सत्तार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : गेल्या वेळेस कोल्हापूर, कोकणात अतिवृष्टी होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी एक विशेष बाब म्हणून निधी दिला. त्याच प्रमाणे याही वेळेस केंद्राच्या नियमानुसार नुकसानभरपाई न देता एक वेगळा निधीची मुख्यमंत्री घोषणा करतील, असे ग्रामविकास महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार सांगितले.

हेही वाचा: Aurangabad Crime : पैठणमध्ये शेतात तरुण शेतमजुराचा खून

ग्रामपंचायतस्तरावरील मिळालेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या व्याजातून खरेदी केलेल्या २० रुग्णवाहिकांचे शनिवारी (ता. ११) येथे लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते.
‘‘आठावीस दिवसांच्या खंडानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. यात राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. राज्यात ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे त्या ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. नुकसानीचा खरा आकडा चार ते पाच दिवसांत तयार होईल. त्यानंतर तो मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार आहे. त्यावर कॅबिनेटमध्ये निर्णय होऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल’’, असे सत्तार म्हणाले.

हेही वाचा: गुरूच्या विरहाने शिष्यानेही सोडला श्वास, विलास शेटे यांचे निधन

दरम्यान, औरंगाबाद ते नगर, नगर ते पुणे या मार्गासाठी नव्या रेल्वेलाइनसाठी सर्वेक्षणाची मागणी राज्य शासनाच्या वतीने रेल्वेमंत्र्यांना करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे मुंबईत पार पडलेल्या बैठकीत करण्यात आली असून, त्यामुळे उद्योग वाढीला लाभ मिळेल. जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते १७ सप्टेंबरला होईल. ही इमारत पालघरच्या जिल्हा परिषद इमारतीच्या धर्तीवर होत असून, सुमारे ६० कोटींची खर्च अपेक्षित आहे. पुढील वर्षभरात ही इमारत जलदगतीने उभी राहील. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही सत्तार यांनी दिली.

loading image
go to top