World Diabetes Day: बालकांमध्ये का वाढतंय मधुमेहाचं प्रमाण? तज्ज्ञ सांगतात...

‘सायलेंट किलर’ : १४ वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश ; काळजी घेण्याची गरज
Childrens Day and Diabetes Day health news blood pressure heart disease diabetes
Childrens Day and Diabetes Day health news blood pressure heart disease diabetes esakal

औरंगाबाद : गेल्या काही वर्षांत देशात रक्तदाब, हृदयविकाराबरोबरच मधुमेह या आजाराचे प्रमाणही वाढत आहे. मधुमेह ‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखला जातो. दुर्दैवाने या रोगाला आता बालकेही बळी पडत आहेत. एकूण मधुमेही रुग्णांच्या १२ टक्के रुग्ण हे बालमधुमेही आहेत. शहरात तर दीड वर्षांपासूनच्या बालकांसह १४ वर्षापर्यंतच्या मुलांमध्येही मधुमेहाचे प्रमाण आढळत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

मधुमेहाचे रुग्ण जगाच्या पाठीवर सर्वत्र आढळतात. जागतिक सर्वेक्षणानुसार, देशात जुलै २०२१ पर्यंत १२.३ टक्के म्हणजे ९८ हजार बालकांना मधुमेह झाल्याचे आढळले असल्याची माहिती बालरोग तज्ञ डॉ. मंजूषा शेरकर यांनी दिली. १९८० मध्ये १० कोटी रुग्ण होते हा आकडा २०१४ मध्ये ४२ कोटींवर पोहोचला आहे. बालकाच्या शरीरात सुरवातीपासूनच इन्शुलिनचे प्रमाण कमी असल्याने हा आजार होतो.

बालकांमध्ये दिवसेंदिवस मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. काही प्रमाणात आनुवंशिक असले तरीही याचे कारण निश्चित सांगता येत नाही, असे बालअंतरग्रंथी तज्ञ डॉ. संध्या कोंडपल्ले यांनी सांगितले. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार दररोज इन्शुलिन घेणे, आहाराबद्दलच्या सूचना पाळणे, योग्य व्यायाम आणि नियमित साखरेची तपासणी करणे या बाबी पाळल्या तर काहीही घाबरण्याचे कारण नाही, असे डॉ. कोंडपल्ले यांनी सांगितले.

मधुमेहाचे दोन प्रकार

मधुमेहाचे टाइप-१ आणि टाइप-२ असे दोन प्रकार आहेत. दोन्ही प्रकारचे मधुमेह शरीराचे नुकसान करतात. टाइप १ मधुमेहामध्ये, स्वादुपिंड इन्शुलिन अजिबात तयार करत नाही. विशेषत: यामध्ये बालकांचा सामावेश आहे. तर टाइप २ मधुमेहामध्ये, स्वादुपिंड कमी इन्शुलिन तयार करते. भारतात टाइप-२ मधुमेहाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मधुमेहासाठी बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, ताण-तणाव, पूरक आहाराचा अभाव आदी कारणे सांगितली जातात.

बालकांना होणाऱ्या मधुमेहामुळे खेळण्याच्या बागडण्याच्या वयातच आजारामुळे पथ्ये पाळावी लागतात. हा गंभीर आजार असल्याने आपोआपच मानसिक खच्चीकरण होते. मात्र असे असले तरीही अजिबात घाबरण्याची गरज नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेण्याबरोबरच काहीशी जीवनशैली बदलण्याची गरज आहे.

- डॉ. मंजूषा शेरकर (सचिव, बालरोग तज्ज्ञ संघटना, औरंगाबाद)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com