शिवशाहीचे वचन देणाऱ्यांनी महाराष्ट्रात निजामशाही आणली : चित्रा वाघ

माजी गृहमंत्री अजून फरार आहेत. त्यामुळे फरार झालेल्या दरोडेखोरांना कसे काय पकडतील?
चित्रा वाघ
चित्रा वाघचित्रा वाघ
Updated on: 

तोंडोळी (जि.औरंगाबाद) : अतिशय संतापजनक आणि दुर्दैवी घटना आहे. मोलमजुरी करणारे कुटुंब आहे. छोटसं बाळ आहे. त्या बाळाला अक्षरशः काडीची पेटी लावून ओठ जाळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आणि त्याच बरोबरीने दोन महिलांवर जवळपास सहा ते सात जणांनी पाशवी आणि अमानुष अशा बलात्कार केला आहे. त्यामुळे या घटना रोज घडतायत. पण कशा पद्धतीने राज्यातील गोरगरीब महिलांना या विकृतीच्या वासनेला बळी पडतायत. ते आपल्याला या घटनेवरुन दिसते. मी तर सुन्न झाले आहे. काय बोलावे हे कळत नाही. त्यामुळे खूप प्रश्न उपस्थित होतात. राज्यात महिला व मुलींच्या सुरक्षेचा ऐरणीचा प्रश्न आहे. त्यामुळे शिवशाहीच वचन देणाऱ्यांनी हे निजामशाही महाराष्ट्रात आणली, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही, असे घणाघाती टीका भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. तोंडोळी (ता.पैठण) येथे दोन महिलांवर सामुहिक बलात्काराची घटना घडली. या पीडित कुटुंबीयांची आज गुरुवारी (ता.२१) भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. (Crime In Aurangabad)

चित्रा वाघ
आर्यन खानच्या जामीनावर प्रशांत भूषण म्हणाले, हा काय मूर्खपणा !

चित्रा वाघ म्हणाल्या, अत्यंत गरीब कुटुंब आहे. त्यांना तात्काळ शासनाने मदत द्यायला पाहिजे. पोलिसांशी आताच बोलले. ते म्हणाले आमचा तपास चालू आहे. माजी गृहमंत्री अजून फरार आहेत. त्यामुळे फरार झालेल्या दरोडेखोरांना कसे काय पकडतील? हे माहित नाही. पोलिसांना बळ मिळो. आणि लवकर ते पकडले जावोत, ही आमची सुद्धा इच्छा आहे, असे वाघ म्हणाल्या. राज्यामध्ये निजामशाही, मोगलाई अवतरल्याची सगळ्यांची भावना आहे. वेगवेगळ्या विषयांवर ज्ञान झोडणारे सर्वज्ञांनी मला वाटतात. त्यांना उच्च प्रतिची गांजाची नशा उतरली नसल्याचे दिसते. कारण त्यांच्यापर्यंत औरंगाबादची घटना पोहोचलेली दिसत नाही.

चित्रा वाघ
देशाला कोरोना लशींचे मजबूत कवच, महामारीविरोधात १०० वर्षे लढा देईल

कारण प्रत्येक वेळेला आम्ही महिला अत्याचारांवर बोलतो. त्यावेळेला विरोधकांचे थोबाड फोडा असे म्हणणाऱ्या सर्वज्ञानी अजूनपर्यंत या घटनेवर काही बोललेले नाहीत. रोज सकाळ, दुपार व संध्याकाळ येऊन आमच्या सरकारला धोका नाही, असे म्हणणारे कसला मिनिमम प्रोग्रॅम करित आहेत. महिला सुरक्षा हा मुद्दा आहे की नाही? राज्यात महिलेवर सामुहिक बलात्कार होतो, त्यावर एकही चकार शब्द बोलले जात नाही हे दुर्दैव, अशी चिंता चित्रा वाघ यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com