
Uorfi Javed : हिंदू राष्ट्र, तालिबान, महिलांच्या कपड्यांवर नियंत्रण ; उर्फीचे खळबळजनक ट्वीट
Uorfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद आणखी वादात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या अनोख्या फॅशनवर आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती. चित्रा वाघ यांनी उर्फीवर सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी तक्रार देखील घेतली होती. (Uorfi Javed and Chitra Wagh Controversy)
उर्फी जावेदची आज अंबोली पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. यावेळी उर्फीने तिला संविधावने कपडे परिधान करण्याचे स्वतंत्र्य दिले असल्याचे सांगितले. दरम्यान उर्फी जावेदने ट्वीटरवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
"एकीकडे त्यांना हिंदू राष्ट्र हवे आहे, तर दुसरीकडे महिलांच्या कपड्यांवर नियंत्रण ठेवण्याचे तालिबानी नियम लागू करायचे आहेत. हिंदू धर्म हा सर्वात जुना धर्म आहे, तो स्त्रियांच्या बाबतीत खूप उदारमतवादी म्हणून ओळखला जातो. मग तुम्ही कुठल्या संस्कृतीबद्दल बोलताय?", असा सवाल उर्फी जावेदने उपस्थित केला आहे.
उर्फी जावेदने नाव न घेता थेट चित्रा वाघ यांच्यावर आक्रमक हल्ला केला आहे. "बलात्कार, डान्सबार आणि राजकारणी नेते महिलांना तिच्या कपड्यांमुळे मारण्याची उघडपणे धमकी देतात, हा भारतीय संस्कृतीचा भाग नाही," असे उर्फीने म्हटले आहे.
उर्फीने काही लेण्यांचे फोटो देखील ट्वीट केले आहेत. "प्राचीन हिंदू स्त्रिया अशाप्रकारे पेहराव करत असत. हिंदू उदारमतवादी होते, शिक्षित होते, स्त्रियांना त्यांचे कपडे निवडण्याची मुभा होती, खेळ, राजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग होता. ते लैंगिक आणि स्त्री शरीराबाबत सकारात्मक लोक होते. प्रथम भारतीय संस्कृतीबद्दल जाणून घ्या," असा सल्ला उर्फीने नाव न घेता चित्रा वाघ यांना दिला आहे.