esakal | जमावबंदी नियमाला नागरिकांचा ‘खो’
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नागरिकांतर्फे लोक एकत्र येत जमावबंदीचा आदेश धुडकावत आहेत. कैलासनगर, जूना मोंढा, सिडको एन-७,एन-८, टीव्ही सेंटर,कॅनॉट प्लेस, निराला बाजार यासह विविध भागात लोक एकत्र आले होते

जमावबंदी नियमाला नागरिकांचा ‘खो’

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : जिल्हा प्रशासनाने सोमवारी (२३) पहाटे पाचपासून ते ३१ मार्च पर्यंत शहरात जमावबंदीचे आदेश जारी केले आहे. हा आदेश लागू केल्यानंतर दवाखाने, मेडिकल, पेट्रोलपंप, दूध डेअरी व भाजीपाला विक्री सोडता सर्व दुकाने बंद होती. अशीच परिस्थिती मुख्य बाजारपेठेतही पाहायला मिळाली. असे असले तरी या आदेशाची सर्वसामान्य नागरिकांकडून पहिल्याच दिवशी पायमल्ली करण्यात येत आहे. 

नागरिकांतर्फे लोक एकत्र येत जमावबंदीचा आदेश धुडकावत आहेत. कैलासनगर, जूना मोंढा, सिडको एन-७,एन-८, टीव्ही सेंटर,कॅनॉट प्लेस, निराला बाजार यासह विविध भागात लोक एकत्र आले होते. जिल्हा प्रशासनातर्फे वारंवार सांगूनही सर्वसामान्य नागरिक या आदेशाकडे व कोरोना आजाराकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे सध्याचे चित्र आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

शहरातील मॉल, रेस्टॉरंट हॉटेल्सच्या परिसरातही नागरिक एकत्र येताना दिसले. तसेच जळगाव रोड ,जालना रोडवर काही ठिकाणी चहाच्या टपरी सुरु होत्या यामउळे या ठिकाणी गर्दी झाली होती. गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या मदतीने स्त्यावरील या टपर्‍या बंद करण्यात आल्या.

नागरिकांतर्फे स्वतःहून जमावबंदी न करण्याच्या सूचनाही गस्तीवर असलेल्या पोलिसांनी माईक च्या माध्यमातून दिल्या. मात्र शहरातील प्रत्येक कॉलनीत ठिकाणी अशा प्रकारचे लोक एकत्र येत आहेत. हे प्रकार टाळण्यासाठी प्रशासन त्यांच्या पातळीवर प्रयत्न करत असले तरी सर्वसामान्यांनीही आपली जबाबदारी स्वीकारत या आजाराशी लढण्यासाठी प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

loading image