CM Devendra Fadnavis: रस्ता रुंदीकरणाला पाठिंबा; मुख्यमंत्री फडणवीस; गरज असेल तिथे भूसंपादन
Chhatrapati Sambhajinagar: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर शहराला ईव्ही आणि मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून महत्त्व दिले. शहरातील रस्ता रुंदीकरण मोहीमेवर पाठिंबा देत शासनाच्या निधी व मदतीची हमी दिली.
छत्रपती संभाजीनगर: ‘ईव्ही, मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून छत्रपती संभाजीनगर शहराला राज्यात महत्त्व प्राप्त झाले आहे. डीएमआयसीमुळे अनेक मोठ्या संधी उपलब्ध झाल्या. त्यामुळे शहरात पायाभूत सुविधा उभ्या करणे गरजेचे आहे.