
थंडीची लाट कायम, औरंगाबाद-लातूरमध्येही हुडहुडी
परभणी : गेल्या चार दिवसांपासून मराठवाड्यात थंडीची लाट कायम आहे. परभणी शहरात शनिवारी (ता.२९) यंदाच्या सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली. तापमानाचा पारा ५.६ अंशांवर घसरला. त्या पाठोपाठ औरंगाबाद ८ तर लातूर शहराचे तापमान ८.५ अंश सेल्सिअस इतके कमी नोंदविले गेले. दरम्यान, आगामी दोन दिवसांत तापमानाचा पारा परत वर चढण्याचा अंदाज परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला.
हेही वाचा: भारत-इस्राईल सहकार्याचे विकासगाथेत मोठे योगदान
परभणी शहरात तापमान गेल्या दोन-तीन दिवसांपासून खाली सरकत आहे. शनिवारी तापमानाच्या पाऱ्याने नीचांकी गाठला. शनिवारी ५.६ अंशांपर्यंत तापमान खाली घसरल्याची माहिती कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम विभागाचे प्रमुख समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी दिली. यावर्षीचे परभणी शहराचे सर्वांत कमी तापमान ठरले आहे.
तापमान कमी झाल्याने याचा जनमानसावर परिणाम दिसून आला आहे. आधीच संपूर्ण जिल्ह्यात सर्दीचे रुग्ण वाढलेले आहेत. कोरोनाचे रुग्णदेखील वाढत आहेत. अशा परिस्थितीत अधिक थंडी पडल्याने नागरिक हैराण झाले आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून परत एकदा थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाजदेखील हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
हेही वाचा: 12 तासात 5 दहशतवाद्यांना कंठस्नान; सुरक्षा दलाला मोठं यश
आकडे बोलतात
l परभणी ५.६
l औरंगाबाद ८.०
l लातूर ८.५
l नांदेड १०.६
l उस्मानाबाद ११.०
l हिंगोली १२ अंश
l बीड किमान : १२
l जालना १४ अंश
Web Title: Cold Wave Persists In Aurangabad Latur Too Temperature Degrees
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..