भारत-इस्राईल सहकार्याचे विकासगाथेत मोठे योगदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी sakal

नवी दिल्ली : ‘‘भारत आणि इस्राईल यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धींगत व्हावेत म्हणून नव्या ध्येय निश्चितीसाठी यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही. याच सहकार्याचे दोन्ही देशांच्या विकास गाथेमध्ये मोठे योगदान आहे.’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. भारत आणि इस्राईल यांच्यातील राजनैतिक संबंधांना तीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जारी केलेल्या विशेष व्हिडिओ संदेशात त्यांनी ही बाब मांडली. विशेष म्हणजे मोदींनी त्यांच्या भाषणात ‘पेगॅसस’ या स्पायवेअरचा कोठेही उल्लेख केला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
ऑनलाइन सभेदरम्यान नगरसेवकाकडून सिगारेटचे झुरके

मोदी म्हणाले, ‘‘याच दिवशी दोन्ही देशांतील सहकार्याचे नवे पर्व सुरू झाले होते पण त्याचा ऐतिहासिक वारसा मात्र फार पुरातन आहे. मागील अनेक शतकांपासून पान १ वरून

भारतामध्ये ज्यू समुदायाचे वास्तव्य असून येथील वातावरण सौहार्दपूर्ण असल्याने त्यांना कसल्याही प्रकारच्या सापत्न वागणुकीला सामोरे जावे लागले नाही, येथे त्यांच्या विकासाला हातभारच लागला. देशाच्या विकासामध्येही ज्यू समुदायाचे मोठे योगदान आहे. जगामध्ये आज मोठे बदल घडत असताना भारत आणि इस्राईल यांच्या द्विपक्षीय सहकार्याचे महत्त्व आणखी वाढले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
Punjab Assembly Election: काँग्रेसची पसंती उच्चशिक्षितांना

भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना उभय देशांतील सहकार्य अधिक वृद्धिंगत करता यावे म्हणून नवी ध्येये निश्चित करण्यासाठी आतापेक्षा चांगली वेळ असूच शकत नाही. पुढील वर्षीपासून इस्राईलचाही अमृत महोत्सव सुरू होईल. आता दोन्ही देशांतील सहकार्याला तीस वर्षे पूर्ण झाली आहेत. या महत्त्वाच्या क्षणानिमित्त मी सर्वांचे अभिनंदन करतो. येत्या काही दशकांमध्ये भारत आणि इस्राईलची मैत्री सहकार्याचे नवनवे विक्रम करेल याचा मला विश्वास आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com