Aurangabad News : विनयभंगाचा आरोपानंतर विशाल ढुमे यांच्यावर आयुक्तांकडून कारवाई

लिफ्टच्या बहाण्याने पोलिस अधिकाऱ्याकडून मित्राच्या बायकोचीच छेड गुन्हा दाखल
Aurangabad News
Aurangabad NewsEsakal

औरंगाबाद पोलीस दलात खळबळ उडवून घडना समोर आली आहे. नाईट ड्युटीवर असताना मित्राच्या पत्नीची छेड काढल्याच्या आरोपानंतर औरंगाबाद शहर पोलीस दलातील 'एसीपी'वर शहरातील सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल ढुमे असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.

विनायभंगाचा हा गंभीर गुन्हा ढुमे यांच्यावर दाखल झाल्यानंतर औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी ही कारवाई केली आहे. विशाल ढुमे यांच्याकडे औरंगाबादचे क्राईम ब्रांच ACP आणि त्याचबरोबर वाहतूक शाखेचे ACP हे दोन चार्ज त्यांच्याकडे होते. हे दोन्ही चार्ज काढून घेण्यात आले आहेत. त्यांची आता गुन्हे शाखेतून नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

हे ही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

नाईट ड्युटीवर असतांना ढुमे यांनी रात्री 2 वाजेच्या सुमारास एका घरात घुसून महिलेची छेडछाड केल्याचा आरोप कऱण्यात आला आहे. विशाल ढुमे रात्री एका हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी गेले होते. तिथे त्यांना ओळखीचा एक मित्र भेटला. तो मित्र त्याच्या बायकोसोबत तिथे आला होता. हॉटेलमधून निघताना ढुमेंनी, माझ्याकडे गाडी नाही, मला लिफ्ट द्या, अशी विनंती मित्राला केली. त्यानंतर गाडीत बसताच ढुमे यांनी समोर बसलेल्या मित्राच्या पत्नीच्या पाठिवरून हात फिरवत विनयभंग करण्यास सुरुवात केली, असा आरोप आहे.

Aurangabad News
Crime News : लिफ्टच्या बहाण्याने पोलिस अधिकाऱ्याकडून मित्राच्या बायकोचीच छेड; गुन्हा दाखल

ढुमे ऐवढ्यावरच न थांबता, पुढे आल्यावर त्यांनी मला वॉशरूमला जायचे असून, तुमच्या घरी घेऊन चला अशी मागणी केली. घरी पोहचल्यावर तुमच्या बेडरूम मधला वॉशरूम मला वापरायचा आहे, असं म्हणत वॉशरूम वापरण्याची परवानगी मागितली. त्यावेळी त्याने तिथे देखील महिलेची छेड काढली. तसेच महिलेच्या पतीला मारहाण केली, असा आरोप करण्यात आले आहे.

Aurangabad News
Urfi Javed : उर्फी जावेद मुस्लिम असल्याने भाजपकडून टार्गेट...तृप्ती देसाई अ‍ॅक्शन मोडमध्ये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com