Aurangabad | औरंगाबादेत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकाची आत्महत्या

रमेश हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता.
Competitive Exam Aspirant Youth Committed Suicide In Aurangabad
Competitive Exam Aspirant Youth Committed Suicide In Aurangabadesakal

आडूळ (जि.औरंगाबाद) : बीए केल्यानंतर स्पर्धा परीक्षेची (Competitive Exam) तयारी करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.आठ) औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील आडूळ (ता.पैठण) शिवारात सकाळी उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. रमेश बमनावत असे मृत तरुणाचे नाव आहे. पाचोड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी आडुळ खुर्द (ता.पैठण) शिवार या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या काही नागरिकांना रस्त्याच्या कडेला एक अनोळखी युवक मृतावस्थेत दिसला. त्यामुळे त्यांनी याची माहिती तत्काळ पाचोड पोलीसांना दिली. माहिती मिळताच ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे, बिट जमादार जगन्नाथ उबाळे, रविंद्र क्षीरसागर, श्री.चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. (Competitive Exam Aspirant Youth Ended His Life In Aurangabad)

Competitive Exam Aspirant Youth Committed Suicide In Aurangabad
मरावे परी कीर्ति रुपी उरावे ! वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी देहदान

यानंतर नातेवाईक व ग्रामस्थ जमा झाले तेव्हा या तरुणाचे नाव रमेश रामचंद्र बमनावत (रा. पिंवळवाडी ता. जि.औरंगाबाद) हा युवक सोमवारपासून (ता.सात) घरातून कोणालाही काही ही न सांगता गेला होता. कुटुंबीयांनी त्याचा बराच वेळापर्यंत इतरत्र शोध घेतला. परंतु तो मिळून आला नाही. शेवटी आज मंगळवारी सकाळी आडूळ-गेवराई आगलावे रस्त्यालगत असलेल्या एका शेतात ये-जा करणाऱ्या नागरिकांना रमेश बमनावत हा मृतावस्थेत आढळून आला.

Competitive Exam Aspirant Youth Committed Suicide In Aurangabad
कोरोना काळात कुणी काय केलं, चंद्रकांत पाटलांचा महाविकास आघाडीला सवाल

पुढील तपास पाचोड पोलीस करित आहेत. मृत युवकाच्या मृतदेहा शेजारी एक दुचाकी व विषारी औषधाची रिकामी बाटली आढळुन आली असून ही हत्या की आत्महत्या या विषयी तर्क वितर्क लावले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com