Aurangabad : बांधकाम विभाग पाहतोय अपघाताची वाट?

भविष्यात या पुलावर मोठी दुर्घटना होण्याची भीती
construction department waiting accident
construction department waiting accidentsakal
Summary

भविष्यात या पुलावर मोठी दुर्घटना होण्याची भीती

कंधार : कंधार-मुखेड या दोन तालुक्यांना जोडणारा बहाद्दरपुरा येथील मन्याड नदीवरील पूल गेल्या काही वर्षांपासून वाहतुकीसाठी अडचणींचा ठरत आहे. या पुलाची अवस्था चव्हाट्यावर आणूनही सार्वजनिक विभागाची कुंभकर्णी झोप मात्र मोडत नाही.

बांधकाम विभाग माणसे मरण्याची प्रतीक्षा करते की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. संबंधितांचा निगरगट्टपणा प्रवाशांच्या जीवावर येत असून बांधकाम विभागाचे असेच दुर्लक्ष राहिल्यास भविष्यात या पुलावर मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार व माजी खासदार डॉ. केशवराव धोंडगे यांच्या अथक प्रयत्नातून जवळपास पन्नास-पंचावन्न वर्षांपूर्वी बहाद्दरपुरा येथील मन्याड नदीवर बांधलेल्या या पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहन चालविताना चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. पुलाची अवस्था कशी झाली, अपघातांना कसे निमंत्रण मिळत आहे हा प्रश्न वेळोवेळी माध्यमांनी चव्हाट्यावर आणला.

परंतू कोणीच याकडे लक्ष देत नाही. पुलाचे कठडे तुटल्याने कोणती गाडी कधी पुलाच्या खाली जाईल याचा नेम नाही. सध्या मानार प्रकल्प हा पूर्ण क्षमतेने भरला असून धरणाच्या बॅक वॉटरमुळे मन्याडच्या पाणी पातळीत वाढ होऊन पाणी पूलाला चिटकला आहे. पुलावर पडलेले खड्डे, तुटलेले कठडे, बंद झालेले पथदिवे, पुलाच्या दोन्ही बाजूने काठोकाठ तुडुंब भरलेले पाणी या सर्व गोष्टीचा विचार करणे आवश्यक असताना बांधकाम विभाग बघ्याची भूमिका पार पाडत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com